NMJOKE

नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास नक्की वाचा

नाना पाटेकर याना कोण नाही ओळखत भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांना मोठी ओळख आहे. मुळात नाना यांचं खार नावच अजून तुम्हाला किंवा खूप लोकांना माहित नाही तर आज आपण नाना विषयीच थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नाना पाटेकर यांचं खार नाव विशवनाथ नाना पाटेकर आहे. १ जानेवारी १९५१ ला यांचा जन्म मुरुड जंजिरा म्हणजेच रायगड जिल्ह्यात झाला. नानाचे वडील दिनकर पाटेकर हे टेक्स्टाईल प्रिंटर बीजनसमन होते आणि आई चे नाव संजनाबाई पाटेकर.

नानांनी सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून आपले शिक्षण पूर्ण केले. अनेकदा नाना पोलिसांची मदत करतात जेव्हा एखाद्या गुन्हेगारच स्केच काढायचं असत. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी नाना जाहिरात एजन्सी मध्ये काम करत होते. स्मिता पाटील यांच्या हातभारामुळे नाना चित्रपटसृष्टीत आहे. स्मिता यांनी प्रोड्युसर रवी चोप्रा कडे नाना याना नेले. “आज कि आवाज” या चित्रपटात बलात्कारी पुरुषाची भूमिका नानांना दिली यामुळे नाना जरा नाराज देखील झाले. नानांनी प्रोड्युसर ला काही त्यांना भूमिका दिली गेली.नाना १३ वर्ष्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे त्यांची सर्व संपत्ती विकावी लागली आणि परिणामी नानांना रोज ८ किलोमीटर लांब चालत जावे लागले. ते चुनाभट्टी ला जाऊन चित्रपटांचे पोस्टर पेंट करत आणि त्याचे त्यांना महिन्याला ३५ रुपये पगार मिळत. नानांनी गावातील नाटकात देखील काम केले आणि नंतर ते ७५० रुपये महिना कमवत असताना त्यांचं निळकंठी यांच्याशी लग्न झाले. मात्र ते आज जे काही घडू शकले ते त्यांच्या सुंदर अभिनयामुळे आणि स्मिता पाटील यांच्यामुळे. अश्या नानांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्या.
Exit mobile version