अशोक सराफ यांचा जीवनप्रवास नक्की वाचा

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ ला मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी भागात त्यांचं बालपण गेलं. मुंबईतील डी जी टी विद्यालयात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि बालपणापासून नाटकांची आणि अभिनयाची आवड असणाऱ्या या कलाकाराने वयाच्या अठराव्या वर्षी शिरवाळकरांच्या “ययाती” आणि “देवयानी” या नाटकांमध्ये विदूषकाचे भूमिका साकारली आणि अभिनय क्षेत्राच्या वाटचालीत प्रवेश केला. ‘गजानन जहांगीरदार’ यांच्या “दोन्ही घरचा पाहूना” या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली.

१९७१ पासून त्यांनी मागे वळून पहिले नाही सर्वच क्षेत्रात अभिनय करत राहिले. मराठी सिनेमे, हिंदी सिनेमे, मराठी नाटक, मराठी मालिका अश्या सर्वच ठिकाणी आपला ठसा अशोक सराफांची उमटवला व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांना सहवास लाभला तो दिग्गज निर्माते, अभिनेते दादा कोंडके यांचा आणि चित्रपट आला “पांडू हवालदार”. १९७७ साली आलेल्या “राम राम गंगाराम” चित्रपटामुळे त्यांची ओळख आणखीन जास्त वाढली. करण अर्जुन, कोयला, जोरु का गुलाम असे अनेक हिंदी सिनेमे देखील प्रदर्शित झाले.अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांची जोडी तर अजूनही लोक खूप मिस करतात. मात्र आज यामध्ये लक्ष्या नाही याची खंत वाटते आणि दुःख देखील होते. धुमधडाका, चंगू मंगू, भुताचा भाऊ, एकापेक्षा एक अश्या चित्रपटांनी तर मराठी चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला ज्यांचे डायलॉग आणि सिन आजही सोशल मीडियावर वायरल होतात व मनोरंजन करतात. त्यांचे चित्रपट आजही लोक उत्सुकतेने पाहतात व टीव्हीवर देखील ते चित्रपट चांगले चालतात मग ते हिंदी चित्रपट असो किंवा मराठी चित्रपट. अश्या या अशोक सराफ याना भावी वाटचालीसाठी शुभेच्या आणि अभिनंदन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *