५०० पैकी ४९९ मार्क काढणाऱ्या सीबीएसई टॉपर ने सांगितलं सिक्रेट

जेव्हा पण परीक्षा संपल्यानंतर निकाल लागणार असतो तेव्हा सर्वांचाच हृदय जोरात धडकू लागत. कोणाला नापास व्हायची भीती असते तर कोणाला आपण प्रथम येऊ का नाही याची. हल्ली स्पर्धेचं युग असल्याने सर्वाना प्रथम येण्याचीच चिंता लागलेली असते मात्र प्रथम क्रमांक एकाचाच किंवा मोजक्यांचाच लागतो कारण हल्ली मुलांना पैकी च्या पैकी मार्क मिळतात. आज आम्ही सीबीएसई टॉपर मध्ये आलेल्या मुलीने सांगितलेलं तिच्या अभ्यासाचं सिक्रेट सांगणार आहोत तसेच तिच्याविषयी थोडक्यात माहिती देखील सांगणार आहोत.

गुरुवार दिनांक २ में २०१९ रोजी सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) द्वारे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित केला गेला. या निकालात यावेळी मुलींनी बाजी मारली आणि दोन मुलींनी ५०० पैकी ४९९ मार्क मिळवले. हंसिका शुक्ला हि डीपीएस गाजियाबाद या शाळेतून तर करिष्मा अरोरा हि एस. डी. पब्लिक स्कुल मुजफ्फर नगर या शाळेतून आहे. या दोन्ही मुलींना इतके उत्तम मार्क मिळाल्याच्या शुभेच्या आपण देऊ आणि हंसिका शुक्ला च्या मनोगताविषयी माहिती घेऊ.हंसिका शुक्ला ला इंग्रजीमध्ये १ मार्क कमी पडला त्यामुळे तिथे तिचा एक मार्क कमी पडला. हंसिका म्हणाली कि, “मी टॉप येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता. मला चांगले मार्क मिळतील हा माझा आत्मविश्वास होता. माझं सिक्रेट हेच आहे कि तुम्ही मेहनत करा टॉप येण्याची काळजी करण्यापेक्षा चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करा. पुढे हंसिका म्हणाली मी परीक्षेसाठी सतत अभ्यास नाही केला मी एक तास अभ्यास करायचे आणि एक तास आराम देखील करायचे.” हंसिका आपले हे श्रेय आपले शिक्षक आणि आईवडिलांना देते. अभ्यास सोडून हंसिकाला पोहायला आणि बॅट मिनटन खेळायला आवडत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *