भीषण अपघात नव्यानवरीसह तिघांचा मृत्यू

मित्रानो आपल्या महाराष्ट्रात लग्न झालं कि नवीन जोडपं आणि घरातील मंडळी देवदर्शनाला जातात व नंतर घरी पूजा केली जाते. अशीच एक नवविवाहित जोडी आणि कुटुंब लग्नानंतर देवदर्शनाला गेलं होत त्यावेळी परतताना हा अपघात झाला आणि यामध्ये नवीन नवरी तिची सासू आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यवतमाळ मध्ये मारेगावजवळ देवदर्शनावरुन परत येताना ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात नववधूसह तिघींचा मृत्यू झाला आहे. तर नवरा देवा उपरे याच्यासह सात जण जखमी आहेत.

क्रुझर गाडीमध्ये असणारे सर्व हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील राहणारे आहेत. नवीन नवरी साक्षी देवा उपरे जिचे वय १९ वर्ष सासू लक्ष्मी उपरे चे वय ५० वर्ष आणि सानिका भोपाळे यांचे वय १४ वर्ष असून त्यांची हि नावे आहेत. मारेगावजवळ मंगळवारी दिनांक ३० एप्रिल २०१९ मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चंद्रपूर इथल्या महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत येत असताना, मारेगावपासून एक किमी अंतरावर अक्षरा रेस्टॉरंटजवळ हा अपघात झाला आहे.हे नवदाम्पत्य लग्नानंतर चंद्रपूरच्या महांकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यावर ते आपल्या घरी येत असताना त्यांच्या क्रुझर गाडीला अज्ञात ट्रकने धडक दिली. हि टक्कर इतकी जबर होती कि जागेवरच दोघींचा मृत्यू झाला व एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ट्रकने दिलेल्या धडकेनंतर क्रुझर गाडीने तीन वेळा पलटी खाली व रस्त्याबाहेर गेली. मोरगाव पोलिसात याची दाखल घेतली जात असून तपास सुरु आहे. मात्र नवीन वधूंसोबत असं झाल्याने शोक व्यक्त होत आहे, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *