aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

आपल्या महाराष्ट्रात धावलेलया पहिल्या एसटी बस ची कहाणी

अनेकांना जुनं ते सोनं म्हणून जुन्या वस्तूंचा संचय करायला फार आवडतो. जुन्या गोष्टींना आठवून त्यात रमून जायला देखील खूप आवडते म्हणूनच आजची हि काही जुनाट आहे. १ जून १९४८ बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ची पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली त्याचे वाहक होते लक्ष्मण केवटे. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि तेव्हा आतासारखी प्रगती नसल्याने साहजिकच बस ओबड धोबड असणार.

महाराष्ट्रात धावणाऱ्या या एसटीच्या पहिल्या कहाणी विषयी सांगताना चालक केवटे म्हणाले, जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. या मार्गाचे प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोक प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. शिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती, पण राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल, या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. बसवर हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे ही बस माळीवाडा वेशीपासून ते पुणेपर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली. त्यावेळी किसन राऊत हे बसचे चालक होते, असे केवटे यांनी सांगितले. पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले. तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे, असेही केवटे यांनी सांगितले. आज श्री केवटे यांचे वय ९२ पेक्षा जास्त आहे.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *