पाच दिवसात गोरे व्हा आणि चेहऱ्याच्या या समस्या देखील दूर करा या घरगुती उपायांनी

प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते कि ती कोणत्याही कार्यक्रमात किंवा गर्दीमध्ये सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसावी. लोकांनी तिला बघताच आश्चर्यचकित किव्हा खुश व्हावं. तिला सतत अस वाटते कि तिच्या चेहऱ्यावर कधीच कुठल्याही प्रकारचा डाग नसावा आणि या बरोबरच तिचा चेहरा नेहमी ग्लो दिसावा. पण ह्या सर्व इच्छा काहीच लोकांच्या पूर्ण होतात. आपल्या ह्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ते विविध प्रकारच्या क्रिम्स लावत असतात आणि कॉस्मेटिक्स चा वापर करतात पण त्याचा चेहऱ्यावर काहीही परिणाम दिसून येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या ह्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. फक्त तुम्हाला खाली सांगितलेले काही उपाय आहेत ते करण्याची गरज आहे आणि याचा परिणाम तुम्ही स्वतः अनुभवाल. हे सर्व उपाय खूपच सोपे आणि कमी दरात होणारे आहेत तसेच घरगुती असल्याने सहज शक्य देखील आहे.

१) हे उपाय करून तुम्ही चेहऱ्यावरचा ‘ग्लोनेस’ (गोरेपन) वाढवू शकता : जर तुम्हाला देखील तुमच्या त्वचेला गोरे ठेवायचे असेल तर एक मोठा टोमॅटो घ्या, त्याचा एका कपमध्ये रस तयार करा. त्या कपमध्ये ताजे कच्चे दूध मिसळवा. हे दोन्ही कपमध्ये टाकल्यानंतर त्याचे चांगले मिश्रण बनवा आणि हळुवार तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्या नंतर चेहरा थोडा वेळ सुखू द्या, जेव्हा तो लेप पूर्णपणे सुखून जाईल तेव्हा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. असे केल्याने तुमचा चेहरा खूप फ्रेश आणि निखळलेला दिसून आल्याचे जाणवेल. हे करून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचा डाग किंवा काळेपणा दिसून येत असेल, तर वरील कृती महिन्यातून २०-२२ वेळा रात्रीच्या वेळेस परत करा, तुमच्या चेहरा निखरायला मदत होईल आणि तुम्हाला ह्यामुळे फ्रेश सुद्धा वाटेल. २) जर चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे सुरकुतणे असतील तर : जर तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे काळे डाग किव्हा सुरकुतणे असतील तर, तर दूध आणि मुलतानी मातीचे मिश्रण करून आपल्या चेहऱ्यावर लावा. हे लावल्यावर त्याला १५ मिनिटे सुखू द्या आणि त्यांनतर चेहऱ्याला कोमट पाण्याने धुऊन घ्या. हे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुतणे कमी होतील.३) दही सुद्धा गोरे होण्यास करते मदत : दही जे खूप सॉफ्ट असते ते आपल्या चेहऱ्याचे ग्लो वाढवण्यास फायदेशीर ठरते. ह्याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याचे गोरेपन वाढते. फक्त पुढील कृती क्रमा-क्रमाने करा. एक वाटी घ्या, आणि त्यात एक मोठा चमचा भरून ओट्स घ्या आणि त्याला एक्दम चांगल्या रीतीने पिसून टाका व हे ओट्स जो पर्यंत पावडर बनत नाही तो पर्यंत पिसत रहा. हे झाल्यानंतर ह्या पावडर ला दहीमध्ये एका चमच्या च्या सहाय्याने मिसळून टाका. तयार झालेल्या ह्या मिश्रण चेहऱ्यावरच्या सर्व भागांवर व्यवस्थित लावून घ्या आणि डोळ्यांना स्पर्श न होण्याची काळजी घ्या. त्याच्या नंतर हा लेप किमान अर्धा तास तरी चेहऱ्यावर तसाच ठेवा व अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका. हे केल्याने तुम्हाला जाणवेल कि चेहऱ्यावरील लहान लहान छिद्रे भरून गेले आहेत आणि चेहरा ग्लो दिसू लागेल. दही ऐवजी तुम्ही दुधावरील साई चा सुद्धा वापर करू शकता आणि ह्यामुळे चिकणेपणा वाढण्यास मदत होते. ४) जर डोळ्याच्या खाली असतील काळे धब्बे : काही मुलीना डोळ्यांखाली काळे डाग यायला लागतात, ज्यमुळे त्यांचा चेहरा गंभीर असा दिसू लागतो. जणू त्यांना कोणी खूप मारलं असावं. ह्या डागांना दूर करण्यासाठी खूपच सोपा उपाय आहे. एक बटाटा कापून त्याचे पातळ भाग बनवून घ्या आणि ह्या बटाट्याच्या पातळ भागाना तुमच्या डोळ्या खालील भागांना झाकून ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही राहिलेल्या बटाट्याचा रस बनवून डोळ्यांच्या बाजूला सुद्धा लावू शकता. हि क्रिया रात्रीच्या वेळेस दररोज करा. रस लावल्यानंतर रात्री झोपून जा आणि सकाळी उठल्या-उठल्या चेहऱ्याला पाण्याने पूर्णपणे धुऊन टाका, ह्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये चमक येईल आणि काळे डाग सुद्धा गायब होऊन जातील आणि इतकच नाही तर, डोळ्या संबंधी असणाऱ्या सर्व समस्या दूर होऊन जातील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *