NMJOKE

जिथे जायची तिथे लोक या अभिनेत्रींचे पाया पडायचे, आता काय करते हि पहा

९० च्या दशकात टीव्ही होते मात्र सर्वांकडे नव्हते त्यात रंगीत टीव्ही तर फार कमी लोकांकडे होते. तुमच्या घरी देखील ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असेल आणि त्यावर दूरदर्शन हा एकच चॅनेल दिसत असेल. तेव्हा अनेक मालिका दूरदर्शन वर लागत होत्या १९८७ मध्ये रामानंद सागर यांची “रामायण” मालिका देखील खूप गाजली होती. अनेक लोक हि मालिका काम सोडून उत्साहाने बघत असत. रामायण ग्रंथ तर सर्वाना माहित आहेच पण लोक तो वाचत नाही मात्र मालिकेच्या आधारे सर्व रामायण लक्ष्यात येत असल्याने लोक आनंदाने बघत.

या मालिकेत अवघ्या १६ वर्ष्याच्या वयात दीपिका चिखलिया या मुलीने सीतेची भूमिका उत्कृष्ट निभावली. दीपिका चिखलिया जणू खरोखरची सीता वाटू लागली होती आणि अजून देखील तिच्या जुन्या फोटॉन पाहून तीच सीता असल्यासारखे वाटते. दीपिका चिखलिया ने काही दिवसांपूर्वी २९ एप्रिल ला आपला ५४ वा वाढदिवस साजरा केला. दीपिका चिखलिया चा अभिनय असा होता कि तिला लोक खरोखर ची सीतामाता मानू लागले होते आणि ती दिसेल तिथे तिच्या पाया पडू लागायचे.
रामायण मालिकेनंतर दीपिका चिखलिया ला अनेक चित्रपटांचे ऑफर आले मात्र तिने जास्त मालिका आणि चित्रपट नाही केले. घर का चिराग (१९८९) आणि राजेश खन्ना सोबत रुपये दस करोड (१९९१) हे चित्रपट तिच्या सुंदर अभिनयासाठी ओळखले जातात. रामायण नंतर हे २ चित्रपट काढून हि अभिनेत्री गायब झाली. मात्र पुन्हा २५ वर्ष्यानंतर २०१७ मध्ये गुजराती शो ‘छुटा छेड़ा’ मध्ये झळकली. तिने खूप वर्ष्यानंतर बी ग्रेड चित्रपटात काम केले. २०१८ ला बातमी आली कि एक्टर मनोज गिरी चा चित्रपट ‘गालिब’ मध्ये दीपिका झळकणार. शूटिंग च पाहिलं शेड्यूल संपलं आहे, पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणखीन बातमी आली नाही.
Exit mobile version