कसा एक गरीब फळ विक्रेत्याचा मुलगा ३००० कोटीपर्यंतचा मालक झाला पहा जीवन प्रवास….

आईस्क्रिम कोणाला नाही आवडत, सगळ्यांचा जेवणानंतरचा आवडतीचा पदार्थ आहे. त्यातल्या त्यात नॅचरल्स च आईस्क्रिम हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. या आईस्क्रिमच्या मागची एक प्रेरणादायी कथा आपण इथे पाहूया. रघुनंदन श्रीनिवास कामथ हे त्या गरीब फळ विक्रेत्याचे नाव जो आज नॅचरल्स सारख्या कंपनीचा मालक आहे. कर्नाटकमधील मंगलोर जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मुलकी गावात कामथ यांचा जन्म झाला. महिन्याला १०० रु कमवून या ७ भावंडांची कशीतरी गुजराण करायचे. काही दिवसांनी कामथ कुटुंब कर्नाटक मधून मुंबईला स्थलांतरित झाले. मुंबईला जुहू कोळीवाडयात १२ बाय १२ च्या खोलीमध्ये त्यांनी दिवस काढले आणि रघुनंदन हे लहान असल्यामुळे त्यांना कॉटखाली झोपावं लागे. सुरुवातीला रघुनंदन यांनी विक्रीचा व्यवसाय केला आणि त्यांचा मोठा भाऊ जो त्यांच्याहून २० वर्षांनी मोठा आहे त्याचा उसळ पावाचा व्यवसाय होता. पुढे त्यांनी गोकुळ रिफ्रेशमेंट मार्फत साऊथ इंडियन फूड आणि घरगुती आईस्क्रिमचा व्यवसाय चालू केला.

कामथ यांना चालेल्या व्यवसायातून असं कळून आलं कि लोकांना आईस्क्रिम जास्त आवडते. यातून त्यांना कल्पना सुचली कि जर आपण फळांचे तुकडे असणारे नैसर्गिक आईस्क्रिम विकले तर कृत्रिम फ्लेवर च्या आईस्क्रिम पेक्षा जास्त आवडेल. पण यासाठी घरातले तयार नव्हते. कोणी मनावर घेत नव्हतं. काही दिवसांनी त्यांच्या पारिवारिक संपत्तीची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना १ लाख रुपये मिळाले. रघुनंदन यांचे काही दिवसांनी लग्न झाले. त्यांना नंतर असं जाणवलं कि मुंबईसारख्या शहरात १ लाख रुपयांत व्यवसाय चालू करणे शक्य नाही त्यासाठी अजून भांडवलाची गरज आहे. यावेळी त्यांची पत्नी अन्नपूर्णा यांनी त्यांना हिम्मत दिली. नातेवाईक आणि मित्रांकडून ३ लाख रुपये जमा करून १९८४ साली आईस्क्रिमचा व्यवसाय जुहू विले पार्ल डेव्हलपमेंट स्कीम (जेव्हीपीडीएस) इथे चालू केला. याप्रकारे रघुनंदन यांनी ३५० स्केअर फूट जागेत पहिले शॉप चालू केले.पती- पन्ति आणि अजून ४ जण हे सगळे शॉप चालवू लागले. सुरुवातीला १० फ्लेव्हरमध्ये आईस्क्रिम बनवत असत. १५ किलो आईस्क्रिम मध्ये एका आठवड्यात १ हजार कप विकले गेले. ते सायकलवरून आईस्क्रिम विकत असत. काही प्रसिद्ध व्यक्तीकडे जाऊनही ते आईस्क्रिम द्यायचे त्यामुळे बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध व्यक्तींशी त्यांची ओळख झाली होती. त्यांना या व्यवसायात यश येत होते. २ वर्षात १४ लाख कमावले. त्यांनी नंतर आपला आईस्क्रिमचा व्यवसाय बराच वाढवला. पर्यटकांनाही हे आईस्क्रिम खूप आवडले. आईस्क्रिमसाठी लागणारे दूध हे मुंबईतल्या प्रसिद्ध नोबेल डेअरीतुन आणतात आणि साखर हि फार्मा ग्रेडची घेतात. त्यांना फळाची योग्य पारख होती आणि आईस्क्रिमसाठी उत्कृष्ट असे पदार्थ ते वापरतात. त्यामुळे नॅचरल्स च्या आईस्क्रिमची चव हि लोकप्रिय आहे. आज कंपनीचे ३००० कोटींचे उत्पन्न आहे. १०० हुन अधिक फ्लेव्हर्स ६० फळापासून बनवले जातात. देशामध्ये नॅचरल्स आईस्क्रिमचे १२५ आउटलेट आहेत. चारकोप कांदिवली वेस्ट स्वतःच्या आईस्क्रिम फॅक्टरीमध्ये रोज २० टन आईस्क्रिम बनवली जाते. आणि देशभरात विकली जाते. त्यांचा हा नॅचरल्स आईस्क्रिमचा व्यवसाय अजूनही प्रगती पथावर आहे. असा आहे रघुनंदन कामथ यांचा एका गरीब घरातून ३००० कोटींपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आवडल्यास नक्की शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *