aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

फुडबॉलपटू रोनाल्डो कडे जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूनच धक्का बसेल

मित्रानो अनेक मोठे बीजनसमॅन, अभिनेते, राजकीय नेते असे दिग्गज मोठे लोक खूप हौशी असतात. पैसे असल्याने त्यांचे शौक पण महागडे आणि निराळे असतात. प्रत्येक जण आपलं वेगळेपण आणि श्रीमंती दाखवण्यासाठी काही न काही करत असतो. अश्यात फुडबॉलपटू रोनाल्डो कडे जगातील सर्वात महागडी कार आली आहे त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे. रोनाल्डोने नुकतीच ‘बुगाटी ला वॉईतूर नॉएर’ ही जगातील सर्वात महागडी मानली जाणारी कार खरेदी केली.

फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘बुगाटी ला वॉईतूर नॉएर’ हि ११ मिलियन युरो म्हणजेच भारतीय रुपयांच्या जवळपास ८६ कोटी रुपये इतकी महागडी कार आहे. भारतात कोणाकडेच अजून इतकी महागडी कार नसेल मात्र रोनाल्डोच्या ताफ्यात हि जगातील सर्वात महागडी कार आली आहे. ‘बुगाटी ला वॉईतूर नॉएर’ या आलिशान स्पोर्ट्स कारला ग्राहक मिळाल्याचा दुजोरा बुगाटी कंपनीने ने दिला आहे. परंतु तो ग्राहक रोनाल्डो असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. स्पॅनिश वृत्तपत्रांनी मात्र याविषयी माहिती दिलेली आहे.‘बुगाटी ला वॉईतूर नॉएर’ या स्पोर्ट्स कारला 8 लीटर क्षमतेचं टर्बोचार्ज्ड व W १६ इंजिन आहे.तसेच हि गाडी तासाला २६० मैलाचा वेग धरु शकते. जिनिव्ह मोटर शोमध्ये ‘बुगाटी ला वॉईतूर नॉएर’ ही कार पहिल्यांदा दाखवण्यात आली होती. ‘बुगाटी’ या फ्रेंच लक्झरी कंपनीने ११० व्या वर्धापनदिना निमित्त ही सुपरकार तयार केली. असे असले तरी मात्र ही कार चालवण्यासाठी रोनाल्डोला दोन वर्ष वाट पाहावी लागेल. कारण अजूनही कारच्या काही बारकाव्यांवर कंपनी काम करत आहे. फूटबॉलपटू रोनाल्डोच्या गाड्यांच्या ताफ्यात सध्या मर्सिडीज, रोल्स रॉईस, फरारी, लॅम्बॉर्गिनी, ऍस्टन मार्टिन आणि बेंटली अशा सर्वच मोठ्या कंपन्यांच्या कार आहेत. त्याला याच्या या नवीन कार साठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *