Home / समाज प्रबोधन / पुण्यात केलेल्या लग्नपत्रिकेच्या अश्या उपक्रमाला त्रिवार सलाम

पुण्यात केलेल्या लग्नपत्रिकेच्या अश्या उपक्रमाला त्रिवार सलाम

सध्या कोणताही कार्यक्रम असला कि त्याची पत्रिका तयार केली जाते. मग तो लग्न, वाढदिवस असो कि उद्घाटनाचा कार्यक्रम असो. माणूस नवीन तंत्रज्ञाचा वापर जागोजागी करीत आहे. मग अशा ठीकांनीपण करावा कि याचा वापर. आज चार माणसांच्या कुटुंबामागे एक झाड नाही पण किमान दोन -तीन तरी मोबाईल आहेत. त्यात फेसबुक , whatsapp चे मेंबर किमान दोनतरी असतातच. हि अतीशयोक्ती नाही. मग आपले काम सोप्पे होत नाही का? यासाठी डीजीटल पत्रीका उत्तम पर्याय होऊ शकतो. अगदी घरीच तंत्रज्ञानाचा वापर करुन छानशी क्लीप संगीताची जोड देऊन तयार करता येईल. आजकाल दोनच अपत्ते असल्याने एकुलता एक मुलगा अथवा एकुलती एक मुलगी यांचा विवाह अगदी थाटात करण्याच अट्टाहास. सुरुवात पत्रीकेपासुनच होते. महागडी पत्रिका जरी छान वाटत असली तरी शेवटी रद्दीतच जाते. मग कशाला हा वायपट खर्च ? काही पत्रीका तर पत्रीका आहे की डेकोरेटीव पुस्तीका !!!हा संभ्रम निर्माण होतो. एका पत्रीकेवर व्यर्थ अनाठाई खर्च करण्यात काय अर्थ आहे???? महत्वाचे पर्यावरणाचे नुकसान. एक टन पेपर तयार करण्यासाठी १७ झाडे लागतात. त्यासाठी लाखो लिटर पाणी आणि उर्जा लागते. जगात एकूण वृक्षाच्या ३३ % वृक्ष हे फक्त पेपर इंडस्ट्री मध्ये वापरले जातात.

पुण्यातील श्री. उदय गाडगीळ पुणेकर पर्यावरण प्रेमी व्यक्तिची ही अप्रतीम संकल्पना! मुलीच्या लग्न पत्रिका रुमालावर पत्रिका छापून वाटल्या. ही पत्रिका दोनदा धुतल्यावर रुमाल म्हणून वापरता येते. आता या संकल्पनेचा प्रसार केला पाहिजे आणि समाजमान्यताही मिळवून दिली पाहिजे! केवळ झाडे वाचवा पर्यावरण वाचवा! असे म्हणत न रहाता ही झाडे वाचवण्याची चळवळ सर्वांपर्यंत पोहोचवूया. छोटी गोष्ट पण उपयुक्तता मोठी! एक रूमाल साधारण १०.०० रूपये. घाऊक घेतले तर ६.०० रूपये. चार रंगी स्क्रिन प्रिंटींगचा खर्च साधारण ३.०० प्रति रूमाल. एकदा कार्यक्रम संपंन्न झाल्यानंतर हा रूमाल धुवून साधारण वर्ष सहा महिने तरी वापरता येईल; या उलट सर्वसाधारणपणे लग्नपत्रिका रद्दीत जातात. आजकाल कागदी पत्रिकाही ३०/३५ रूपयांपर्यंत आहेत, त्यामुळे ही संकल्पना केवळ बचत करणारी नाही तर पुन: वापराचे महत्व अधोरेखित करणारी आहे. दिवसातून एका माणसाला तीन सिलेंडर इतके ऑक्सिजन लागते. हा ऑक्सिजन आपल्याला या झाडांपासून मोफत मिळतो.परंतु अशीच जर वृक्षतोड होत राहिली तर मग आज ज्याप्रमाणे पाणी पिण्याचे बाटलीतून विकत घ्यावे लागत आहे त्याप्रमाणे ऑक्सिजन बाटलीतून विकत घेण्याची वेळ फार लवकरच येणार आहे आपल्यावर आणि याचीपण कंपन्या जाहिराती करतील!!! म्हणून कमीत कमी पेपरचा वापर करा. अनावश्यक खर्च टाळा. झाडे लावा, झाडे जगवा. विचार तर कराल ? (धनंजय देशपांडे यांच्या भींतीवरील पर्यावरणपुरक पत्रिका जोडत आहे. असे काहीतरी करता येईल जर पत्रिकाच छापायची असेल तर….)

Check Also

मांसाहार केल्याने कोरोना होतो का पहा

मित्रानो चीन मध्ये कोरोना वायरस या आजाराची लाट पसरली असल्यामुळे तेथील परिस्थिती खूपच भयावह आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published.