निम्म्यारात्री गोंधळ घालणाऱ्या मोहम्मद शमी च्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

भारतीय क्रिकेट टीम चा तेज गोलंदाज मोहम्मद शमी ची पत्नी हसीन जहां ला आपल्या पतीच्या घरात घुसून गोंधळ घातल्याच्या आरोपामुळे पोलिसांनी मोहम्मद शमी ची पत्नी हसीन जहां ला अटक केली. रविवारी २८ एप्रिल २०१९ रोजी रात्री उशिरा हसीन जहां उत्तर प्रदेश मधील अमरोहा जिल्ह्यातील सहसपुर गावात आपल्या नवर्याच्या घरी म्हणजेच गोलंदाज मोहम्मद शमी च्या घरी पोहचली. जेव्हा हसीन जहां ला तिथून निघून जायला सांगितले तेव्हा हसीन जहां ने स्वतःला आणि आपल्या मुलाला एका खोलीत कोंडून घेतले.

असा प्रकार घडल्यानंतर पोलीस मोहम्मद शमी च्या घरी आले. पोलीस दोघांचे भांडण सोडवण्यासाठी निष्फळ ठरल्याने पोलिसांनी हसीन जहां ला कैद केले आणि पोलीस स्टेशन मध्ये नेऊन तुरुंगात टाकले. नंतर तिला जामिनावर सोडवले देखील. रात्री घरी येऊन तमाशा घातल्याने तिला तुरुंगात टाकले गेले. मात्र नंतर तिला जमीन मिळाला व ती तुरुंगातून मुक्त झाली.हसीन जहां ने नंतर मीडियाला सांगितले कि, “मी येथे माझ्या नवर्याच्या घरी आली आहे आणि मला येथे राहण्याच्या अधिकार आहे. माझ्या सासरचे माझ्यासोबत चुकीचा व्यवहार करत आहेत. पोलीस देखील त्यांचंच समर्थन करीत आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करायला पाहिजे तर ते मलाच पोलीस स्टेशनमध्ये नेत आहेत.” तेज गोलंदाज मोहम्मद शमी आता आईपीएल-१२ मध्ये किंग्स इलेवन पंजाब च्या टीम सोबत खेळात आहे आणि त्याची निवड विश्व कप साठी झाली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *