Home / माहिती / रेल्वे रुळावर खडी असण्यामागची कारणे वाचा, महत्वपूर्ण माहिती

रेल्वे रुळावर खडी असण्यामागची कारणे वाचा, महत्वपूर्ण माहिती

आपल्या लहानपणापासूनच आपण रेल्वे विषयी ऐकत आलो आहोत आणि पाहत आलो आहोत त्यामुळे रेल्वे सर्वाना माहित आहे. अनेकांनी रेल्वे रुळावर खडी पहिली असेल पण हि खडी नेमकी कश्यासाठी असते हे अनेकांना माहित नाही त्याविषयीचं आपण आज चर्चा करणार आहोत. ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले त्यावेळी अनेक सुविधा देखील भातरतात आणल्या रेल्वे देखील त्यापैकीच एक मोठं दळणवळणाचं, वाहतुकीचा आणि प्रवासाचं स्वस्त आणि मस्त साधन आहे. रेल्वेने कमी वेळेत जास्त अंतर पूर्ण होते आणि शिवाय तिकीट खर्च देखील कमी असतो त्यामुळे ती सर्वाना परवडणारी आहे.

मूळ जमिनीपासून रेल्वेरूळ हा उंचावर असतो हे तुम्ही पहिले असेलच, तुम्ही रुळाकडे पहिले तर लांब लांब पट्या समान अंतरावर अंथरलेल्या असतात ज्यावर नंतर रूळ ठेवलेले असतात त्या पट्या काँक्रीट च्या बनवलेल्या असतात व त्या पट्याना स्लीपर असे म्हणतात व त्यावरच नट बोल्ट आणि लोखण्डी साधनाने रूळ फिट केला जातो. दोन रुळामधील अंतर सामान राहावे यासाठी स्लीपर्स वर रूळ फिट केले जातात. स्लीपर्स च्या खाली बॅलास्ट आणि सब बॅलास्ट असते आणि त्यानंतर त्यावर स्लीपर्स असते ज्यावर रूळ फिट केले जातात.बॅलास्ट म्हणजेच खडी असते हि खडी विचित्र आकाराची असते कारण जर गोल खडी घेतली तर ती एका जागी फिट राहणार नाही इकडे तिकडे पसरेल पण हि खडी महत्वाचे काम करते ओबडधोबड असल्याने ती खाडी एकमेकात फिट राहते पसरत नाही. ज्यावर रूळ फिट केलेले असतात त्या स्लिपर्सच्या खाली आणि आजूबाजूला ती असल्याने रूळ जागेवरून हालत नाही हि खडी मजबूत पकडून ठेवते. दुसरं महत्वाचं कारण असं आहे कि त्या खडी मुळे रेल्वेरुळावर झाडे उगवत नाहीत झाडे अथवा गवत उगवले तर रेल्वे सटकू शकते यामुळे झाडे न उगू देण्याचे काम देखील खडी करत असते. एका रेल्वेचे वजन जवळ जवळ १० लाख किलो असते इतके जास्त वजन या खडीमुळे पेलता येते ते रेल्वेला इकडे तिकडे होऊ देत नाही. माहिती आवडल्यास शेअर करा.

Check Also

फोर्ड कंपनीने केला रतन टाटा चा अपमान, मग कसा घेतला बदला पहा

आता तुम्हीही रतन टाटा यांच्या अपमानाची ओळ वाचूनच थक्क झाले असाल. परंतु, हे शंभर टक्के …

Leave a Reply

Your email address will not be published.