Home / कलाकार / या कारणामुळे संजय नार्वेकर ने नाकारली होती “मुन्ना भाई” चित्रपटातील ‘सर्कीट’ची भूमिका

या कारणामुळे संजय नार्वेकर ने नाकारली होती “मुन्ना भाई” चित्रपटातील ‘सर्कीट’ची भूमिका

मित्रानो भारतात अनेक मोठे अभिनेते आहेत ज्यांचे चित्रपट भारतातच नाही तर भारताबाहेर देखील धुमाकूळ घालतात. पण आज आपण बोलणार आहोत “वास्तव” या गाजलेल्या चित्रपटात देडफुट्या ची भूमिका उत्कृष्ट पने निभावणाऱ्या मराठमोळ्या संजय नार्वेकर बद्दल. झी मराठी वाहिनीवर संजय मोने यांच्या ‘कानाला खडा’ या चॅट शो विषयी अनेक चर्चा रंगात असतात. यात संजय मोने अभिनेत्यांसोबत संवाद साधून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनोख्या आठवणींना उजाळा देतात.

‘कानाला खडा’ या चॅट शो मध्ये शुक्रवारी अभिनेता संजय नार्वेकर आला होता तेव्हा त्याने मोठं गुपित उघड केलं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या गाजलेल्या मोठ्या चित्रपटामध्ये सर्किट ची भूमिका करायची ऑफर आपल्या मराठमोळ्या संजय नार्वेकरला मिळाली होती. परंतु तारीख जुळत नसल्याने हि मोठी ऑफर संजय नार्वेकर ने नाकारली.संजय नार्वेकर या शो मध्ये म्हणाले, “संजय दत्त जेव्हा मला भेटला तेव्हा तो मला बोलला कि, तू मला का नाही सांगितलंस? तुझ्यासाठी मी माझ्या तारखा बदलल्या असत्या. माझं वेळापत्रक बदललं असत. संजय नार्वेकर संजय दत्त ला तेव्हा म्हणाला जसं ‘वास्तव’ चित्रपटातील देड फुट्या ही भूमिका माझ्या नशिबात होती, तशी सर्कीटची भूमिका अर्शदच्या नशिबात होती. ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असल्याने  सर्किट ची भूमिका मी नाकारली.  ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटसुद्धा खूप गाजला व लोकांनी खूप पसंती दर्शवली.

 

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.