हा आहे मराठमोळ्या अलका कुबलचा नवरा

तुम्हाला आज येथे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या प्रेमकहाणीची माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने मराठीत बरेच चित्रपट केले आणि हिची ओळख एक शोषिक आणि एक आदर्श सून म्हणून निर्माण झाली. आज आपण येथे अभिनेत्री अलका कुबल आणि समीर आठल्ये यांच्या प्रेमकहाणी बद्दल माहिती घेणार आहोत. नेहमी कॅमेरासमोर असणाऱ्या अलका आणि कॅमेरामागे असणाऱ्या समीर यांचे प्रेम कसे आणि कुठे जुळले याची माहिती घेऊयात. दोघांनाही एकमेकांवर प्रेम कसे झाले हे कळले नाही.

सुरुवातीला अलका आणि समीर यांनी एकत्र चार पाच चित्रपट केले. यामुळे सेटवर त्यांचे बोलणे चालणे चालू होते. एका चित्रपटाच्या वेळी अलका आणि समीर हे दोघेच होते त्यावेळी यांच्यातील जवळीक वाढली. दोघे जुहू चौपाटीवर फिरायलाही जायचे आणि एकांतात वेळ घालवायचे. अलका यांचा त्यावेळी नुकताच एक चित्रपट प्रसिद्ध झाला होता तो म्हणजे ‘माहेरची साडी’ ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. ‘माहेरची साडी’ हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला. आता अलका यांना लोक ओळखू लागले होते त्यामुळे त्यांचे बाहेर फिरणे थोडे कमी झाले होते.

यांच्या फिरण्याची चर्चा अलका यांच्या घरापर्यंत पोहचली. त्यावेळी त्यांच्या आईने अलकाला विचारले की, नक्की तुमच्यात काय चालू आहे? पण अलका यांना काय बोलावे हे समजले नाही. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दल प्रेम दिसत होते परंतु कोण पुढे होऊन प्रपोज करणार आणि प्रपोज केले तर नकार नाही ना मिळणार या कारणाने बराच काळ त्यांनी एकमेकांना मनातले सांगितले नाही. आई नेहमीच त्या विषयावर विचारू लागल्याने अलका यांनी समीरला विचारले. आपण दोघे फिरतो त्यामुळे लोक चर्चा करतात आणि मला आई सुद्धा विचारत आहे मग आपण दोघे लग्न करूयात का?

असे विचारल्यावर समीर यांनी लगेच होकारही दिला. दोघेही सारख्याच क्षेत्रात काम करत होते आणि नंतर दोघांनाही यश मिळाले नाही आणि समीर नेहमी कॅमेराच्या मागे राहणार मग यांच्यात भांडण होतील या कारणांमुळे सुरुवातीला अलका यांच्या आईने दोघांच्या लग्नाला विरोध केला. परंतु नंतर अलकाने हट्ट धरल्याने त्यांचे आणि समीर यांचे लग्न झाले. साखरपुडा झाला आणि नंतर लग्नही झाले. ‘माहेरची साडी’ याच्या प्रमोशनवेळी असे प्रसिद्ध केल होत की अलका यांचे लग्न दादरला आहे त्यामुळे तेव्हा लग्नाला चाहत्यांची खूपच गर्दी झाली आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला होता.

अशी आहे या दोघांची प्रेमकहाणी. अलका आणि समीर हे दोघेही एकमेकांचा आधार आहेत. अलका यांनी नंतर ‘लेक चालली सासरला, जखमी कुंकू, ओटी कृष्णामाईची, आई तुझा आशिर्वाद,बकाल’ यांसारख्या अनेक चित्रपट केले आणि त्यांना यश मिळत गेले. त्यांना कस्तुरी आणि ईशानी अशा दोन मुली आहेत. समीर आणि अलका यांच्या कुटुंब आणि दोघांनाही भविष्यासाठी आपल्याकडून शुभकामना देऊयात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *