अक्षय कुमारशी लग्नासाठी ट्विकल ने लावली होती पैज आणि यामुळे

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ह्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटातील मनोरंजक प्रेमकथेपेक्षा कमी नाही. अनेकदा असं होतं कि दोन लोकं प्रेमात पडतात आणि नंतर त्यांचे लग्न होते. अक्षय आणि ट्विंकल ह्याच्या कथेत खूप प्रमाणात असंच झाले, परंतु एक पैज हरल्यानंतर दोघांचे लग्न होऊ शकले. तर आजच्या लेखात जाणून घेऊया अशी कोणती होती ती पैज, ज्यामुळे दोघांनी सुद्धा आपल्या नात्याला लग्नाचे नाव दिले. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर अक्षय कुमारने वेटरचे काम सुद्धा केले आहे. अक्षय कुमारने १९९१ साली ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. साल १९९० पर्यंत अक्षय कुमारने ‘खिलाडी’ म्हणून चित्रपटसृष्टीत स्वतःचे आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या लागोपाठ चित्रपटांच्या नावामध्ये ‘खिलाडी’ हा शब्द असल्यामुळे अक्षय कुमारला सगळेजण खिलाडी कुमार म्हणून ओळखू लागले होते. अक्षयने आपली ओळख बनवली होती तर दुसरीकडे ट्विंकल खन्नाने १९९५ साली बॉबी देओल सोबत ‘बरसात’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते.

ट्विंकलचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठीक ठाक चालला तर दुसरीकडे अक्षय कुमार त्याकाळी बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचला होता. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ह्यांची पहिली भेट मुंबईमध्ये फिल्मफेअर मॅगजीनच्या एका फोटोशूट दरम्यान झाली. पहिल्याच भेटीत अक्षयला ट्विंकल आवडली होती. त्याच्या मनात ट्विंकलने जागा केली होती. अक्षयने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत ह्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केला होता. अक्षयने मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि, “जयेश सेठ च्या फिल्मफेअर शूटच्या दरम्यान माझी आणि ट्विंकलशी पहिली भेट झाली होती. त्या फोटोशूटचे फोटोज आजसुद्धा माझ्याजवळ आहेत.” ह्या फोटोशूट नंतर अक्षय आणि ट्विंकल पहिल्यांदा ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपटात एकत्र आले. ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला. असं बोललं जातं कि ह्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच दोघांमध्ये प्रेम झाले. एका मुलाखतीच्या दरम्यान अक्षयने सांगितले होते कि, ‘ट्विंकलचे सौंदर्यापेक्षा तिच्यातील चांगलेपणा पाहून मी तिच्यादिशेने आकर्षित झालो होतो.”करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ ह्या लोकप्रिय शो मध्ये ट्विंकल आणि अक्षय एकत्र आले होते. ह्या शो च्या दरम्यान अक्षयने सांगितले कि, “ट्विंकलला ‘मेला’ चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. ट्विंकलचा विश्वास होता कि हा चित्रपट नक्की चालेल. इतकंच नाही तर तिने चक्क ह्या गोष्टीवर पैजच लावली. तिने मला सांगितले कि जर हा चित्रपट चालला नाही, तर मी तुझ्याबरोबर लग्न करेल. ‘मेला’ चित्रपट चालला नाही आणि आम्ही दोघांनी लग्न केले.” अक्षय आणि ट्विंकल दोघांनीही ७ जानेवारी २००१ ला लग्न केले. दोघांनीही काही जवळील नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत अबू जानी आणि संदीप खोसला ह्यांच्या घरी ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. ट्विंकलचे करिअर अक्षयच्या तुलनेत चित्रपटसृष्टीत जास्त चालले नाही. ह्याच कारणाने लग्नानंतर तिने चित्रपटांपासून दूर राहणेच पसंत केले. चित्रपटानंतर ट्विंकल इंटिरिअर डिझायनरकडे करिअर म्हणून वळली. आज तिला एक यशस्वी इंटिरिअर डिझायनरच्या नावाने ओळखले जाते. त्याचप्रमाणे ती एक लोकप्रिय लेखिका सुद्धा आहे. भारताच्या बेस्ट सेलिंग ऑथर्स मध्ये सुद्धा तिचे नाव घेतले जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *