हि मराठी अभिनेत्री आहे आशुतोष राणा यांची बायको

अभिनेता आशुतोष राणा हा बॉलिवूडचा एक गुणवान कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक चित्रपटांत आपल्या नकारात्मक भूमिकेने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. आशुतोष राणा ह्याची पत्नी बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे आहे. ‘हम आप के है कौन’ चित्रपटामुळे रेणुका शहाणे प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. दोघांचे लग्न २००१ साली झाले. परंतु त्यांच्या प्रेमाची कहाणी खूपच मनोरंजक अशी आहे. केव्हा दोघांची ओळख झाली, कसा आशुतोषने रेणुकाचा नंबर मिळवला आणि कसे रेणुकाला इम्प्रेस केले ज्यामुळे रेणुकाने स्वतःहून आशुतोषला त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. चला तर आजच्या लेखात आपण त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊया. १९९८ ची गोष्ट आहे, हंसल मेहता ह्यांनी ‘जयते’ नावाचा चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटाच्या ट्रायलसाठी आशुतोष राणाला बोलावले होते. त्यावेळी आशुतोष राणा ह्यांना एकटे जायचे मन नव्हते. म्हणून त्यांनी गायिका राजेश्वरी सचदेव ज्या त्यावेळी आशुतोष राणाची चांगली मैत्रीण होती, तिला सुद्धा सोबत यायला सांगितले. दोघेही एकत्र गेले.

तिथेच रेणुका शहाणे ह्यांना सुद्धा प्रोड्युसरने चित्रपटाचा ट्रायल पाहण्यासाठी बोलावले होते. रेणुका हि राजेश्वरी सचदेवची चांगली मैत्रीण होती. राजेश्वरीने रेणुका आणि आशुतोष ह्यांची ओळख करून दिली. रेणुकाचा त्याअगोदर ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट लोकप्रिय झाला होता, त्यामुळे आशुतोषला तिच्या अभिनयाबद्दल माहिती होते. परंतु रेणुकाने आशुतोषचे काम पाहिले नव्हते. जेव्हा राजेश्वरीने आशुतोषची ओळख एक अभिनेता म्हणून करून दिली तेव्हा तिने ते दाखवलं नाही कि मी तुमचे कोणते काम वैगेरे पाहिले नाही वैगेरे. त्याने त्याच्या ‘दुश्मन’ चित्रपटाचे नाव सांगितले. तिने ऐकले होते कि एका चित्रपटाची चर्चा होती, परंतु तिने तो पाहिला नव्हता. त्यानंतर दोघांची ओळख झाली. त्यांनी जवळपास अर्धा तास सिनेमावर गप्पा मारल्या. गप्पा मारताना रेणुकाच्या साधेपणाने आशुतोषला प्रभावित केले. पहिल्या भेटीतच रेणुकाने आशुतोषच्या मनात घर केले. त्यावेळी ते जुहूला चित्रपटाचा ट्रायल पाहत होते.जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा आशुतोष म्हणाला कि, चला मी तुम्हाला सोडतो. रेणुका दादरला राहायची. तेव्हा तिने विचारले तुम्ही कुठे राहतात. तेव्हा आशुतोष म्हणाला कि मी चेंबूरला राहतो. चेंबूर आणि दादर परस्पर उलट मार्ग पडतो. तेव्हा रेणुकाने सांगितले कि आशुतोषजी मी मुंबईत लहानाची मोठी झाली आहे आणि मी असा कोणता रस्ता पाहिला नाही आहे जो जुहूवरुन चेंबूरला जातो दादरमार्गे. तुम्ही काळजी करू नका, मी नीट घरी जाईल, मला सवय आहे. ह्यानंतर ते भेटले नाही. हळूहळू वेळ निघून जात होती. दिवाळी आली. तेव्हा रेणुकाचा एक रवी राय नावाचा बॅरिस्टर साहेब होता. जो रेणुकाला बाईसाहेब म्हणून हाक मारायचा. त्या बॅरिस्टर साहेबांकडून आशुतोषने रेणुकाचा फोन नंबर मागितला, तेव्हा त्याने सांगितले कि बाईसाहेबांना ९ नंतर फोन करू नका, त्या उचलणार नाहीत. जर बेल वाजत राहिली तर व्हॉइस मेसेज सोडावा लागेल. जर तुम्ही मेसेज न पाठवता फोन बंद कराल तर तुम्ही बेशिस्त व्यक्ती मानले जाल. आणि हे त्यांच्यावर आहे कि त्या तुम्हांला कॉलबॅक करतील कि नाही ते. तेव्हा आशुतोषने सांगितले कि, मला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, ह्यात कोणती मोठी गोष्ट आहे. तेव्हा रवीने त्याला रेणुकाचा घरचा नंबर दिला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *