१९ वर्ष्यानंतर शिल्पा शेट्टीन केला खुलासा धाडकन चित्रपटात

शिल्पा शेट्टीने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांत काम केले आहेत, परंतु तिचा ‘धडकन’ हा चित्रपट अजूनही लोकांना आवडतो. सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या ‘धडकन’चित्रपटांची गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. हा चित्रपट २००० साली रिलीज झाला होता. चित्रपटाच्या कथेपासून ते तिन्ही स्टार्सच्या अभिनयाने चित्रपटाला हिट केले होते. ह्यादरम्यान आताच काही दिवसांपूर्वी ‘सुपर डान्सर’ ह्या डान्स रिऍलिटी शो मध्ये शिल्पा शेट्टी ने चित्रपटाशी जुडलेले एक १९ वर्षे जुने राज उघडले. शिल्पा ने हा खुलासा तेव्हा केला, जेव्हा सुनील शेट्टी ‘सुपर डान्सर’ च्या शो मध्ये एक स्पेशल पाहुणा म्हणून आला होता. शो च्या दरम्यान शिल्पा आणि सुनील शेट्टीने ‘तुम दिल कि धडकन मी रहते हो’ गाण्यावर रोमँटिक डान्स परफॉर्मन्स सुद्धा दिले. ह्याच दरम्यान शिल्पाने चित्रपटाच्या क्लायमॅक्स संबंधित असेल्या एका गोष्टीचा खुलासा केला. शिल्पा शेट्टीने सांगितले कि तुम्ही जो चित्रपटात क्लायमॅक्स पाहिला, अगोदर तो क्लायमॅक्स नव्हता. खरा क्लायमॅक्स वेगळाच होता.

शिल्पाने पुढे सांगितले, ह्या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ह्यामुळे बदल केला गेला कारण चित्रपट निर्मात्यांना नंतर वाटले कि चित्रपटाची हॅपी एंडिंग झाली पाहिजे. अगोदर क्लायमॅक्स मध्ये दाखवले जाणार होते कि जेव्हां अंजली (शिल्पा शेट्टी) देवला (सुनील शेट्टीला) हे सांगते कि ती राम (अक्षय कुमार) च्या मुलाची आई बनणार आहे, हे ऐकून देव हे जग सोडून जातो. निर्मात्यांना नंतर वाटले कि ह्या चित्रपटाचा शेवट खूपच दुःखद होईल. ह्याच कारणामुळे चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे आम्ही शेवटी देव महिमा सोबत निघून जातो असे दाखवले. शो च्या दरम्यान शिल्पाने हे सुद्धा सांगितले कि एक वेळ अशी सुद्धा आली होती कि वाटू लागले कि चित्रपट अडकणार तर नाही ना, कारण ज्यावेळी सुनील शेट्टीला चित्रपटात साइन केले होते तेव्हा तो दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त होता. ह्यानंतर त्याच्या जागी एका वेगळ्या अभिनेत्याला घेतले गेले. चित्रपट निर्मात्यांना नंतर वाटले कि सुनील शेट्टीच देव चे कॅरॅक्टर चांगले निभावू शकते. ह्यानंतर सुनील शेट्टीसोबत पुन्हा चर्चा केली गेली. असे करत करत चित्रपट बनवायला जवळ जवळ ५ वर्षे लागली.‘धडकन’ चित्रपटाने त्यावेळी जवळजवळ २६ कोटींचा व्यवसाय केला होता. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स सुद्धा बनवले होते. ह्या चित्रपटाचे धर्मेश दर्शन ह्यांनी दिग्दर्शन केले होते, तर रतन जैन ह्यांनी हा चित्रपट प्रोड्युस केला होता. ‘धडकन’ चित्रपटाव्यतिरिक्त सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टीची जोडी अजून अनेक चित्रपटांत दिसली. ह्या चित्रपटांत ‘कॅश’, ‘दस’, ‘आक्रोश’, ‘कर्ज – द बर्डन ऑफ ट्रुथ’ आणि ‘पृथ्वी’ ह्यासारख्य चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या १३ वर्षाच्या चित्रपटांतील ब्रेकबद्दल बोलताना शिल्पाने सांगितले कि, “मी चित्रपट इंडस्ट्रीचा भाग आहे आणि मग मी कुठेही राहो, मी नेहमीच ह्या इंडस्ट्रीचा भाग असेल. जेव्हा तुम्ही लाइमलाईटला मिस करतात तेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीची आठवण येते. तुम्हांला अचानक वाटू लागते कि तुम्ही काहीतरी गमावत आहेत आणि लोकं तुम्हांला विसरत आहेत. परंतु मी कधीच असं अनुभवलं नाही, कारण मी सतत टीव्हीवर काम करत राहिली. मी चित्रपटांतून लांब स्वतःच्या मर्जीने झाली होती.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *