माश्यांपासून त्रस्त असाल तर हे घरगुती उपाय नक्की करा

आपल्या घरात भिनभिनणाऱ्या माश्या कोणाला आवडत जे सतत आपल्या आसपास येऊन किव्हा जेवणावर बसून आपल्याला त्रास देत असतात. अश्या मध्ये आपल्याला समजत नाही कि यांच्यापासून सुटका कशी करायची. तर चला आज आम्ही तुम्हाला हि समस्या दूर करण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहोत. म्हणजे काही सोपे घरघुती उपाय करून तुम्ही या माश्यांपासून तुमची सुटका करू शकता आणि पूजेसाठी वापरला जाणाऱ्या कापूरापासून तुम्ही यांच्या पासून आपली सुटका करू शकता. तर हे कास शक्य होईल ते आम्ही तुम्हाला सांगतो, सर्व प्रथम थोडासा कापूर घ्या आणि त्याला जाळून सर्व घरात फिरा. हे केल्याने जळत्या कापूर च्या वासाने माश्या लगेच घरातून पळून जातात.

तुळशीच्या पानांचे आयुर्वेदिक गन तर तुम्हाला माहीतच असतील, पण काय तुम्हाला हे माहित आहे का कि तुळशी माश्यांना पळवून लावण्यासाठी सुद्धा कमी येतात. ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचे झाड असते त्या ठिकाणी जास्त माश्या येत नाहीत. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल कि आपल्या घरात माश्या येऊ नयेत, तर तुळशी चे झाड घरात जरूर लावा जेणे करून माश्या घरामध्ये शिरणार नाहीत.जर एखाद्या ठिकाणी जास्त माश्या फिरत असतात, तर त्या ठिकाणी एका सफरचंदामध्ये थोडीशी लवंग दाबून ठेवा. हे केल्याने तिकडे फिरकत असलेल्या सर्व माश्या काही वेळातच त्या ठिकाणाहून पळून जातील. या व्यतिरिक्त व्हिनेगर हे माश्यांना दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असते. एका लहान वाटीमध्ये थोडेशे व्हिनेगर घ्या आणि त्यामध्ये थोडासा निरमा मिसळा. हे केल्याने सर्व माश्या त्याकडे आकर्षित होतील आणि त्या वाटीच्या बाहेर येऊ शकणार नाहीत आणि तिकडेच मरून जातील.माश्यांना पळवण्यासाठी तुम्ही काकडीचा सुद्धा वापर करू शकता. हे करण्यासाठी तुम्ही काकडी च्या सालपाट्याला कचऱ्यावर ठेवू शकता. ह्यामुळे माश्या त्या ठिकाणी अंडे देऊ शकत नाहीत आणि म्हणून माश्या जास्त प्रमाणात वाढणार नाहीत. माश्या काकडी पासून नेहमी दूर पळतात, म्हणून काकडी माश्यांना पळवण्यासाठी कमी येतात. तुम्हाला वाटले तर माश्यांना पळवण्यासाठी फ्लाय पेपरचा उपयोग करू शकता. ह्याला बनवण्यासाठी पहिले साखर आणि कॉर्न स्टार्च चे मिश्रण बनवा आणि ह्या मिश्रणाला जाड्या ब्राउन पेपर वर पसरवून ठेवा आणि ह्या फ्लाय पेपर घराच्या दरवाज्यावर टांगून ठेवा. ह्यामुळे माश्या घराच्या आतमध्ये प्रवेश करणार नाहीत.लाल मिर्ची च्या मदतीने सुद्धा तुम्ही माश्यांना दूर करू शकता. ह्यासाठी एका स्प्रे बॉटल मध्ये थोडीशी लाल मिर्ची आणि थोडेशे पाणी मिसळून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. आणि नंतर हे मिश्रण घरामध्ये शिंपडा आणि हा प्रयोग करत असताना काळजी घ्या कि, हे तुमच्या डोळ्यांमध्ये जाऊ नये म्हणून याची खास काळजी घ्या नंतर ह्याच्या सहाय्याने सर्व माश्या लगेच मरून जातील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *