राम तेरी गंगा मैली चित्रपटात नको ते सिन देणारी अभिनेत्री पहा आता कशी दिसते

बॉलीवूड मध्ये अश्या भरपूर अभिनेत्री आहेत ज्यानीं पहिल्याच चित्रपटामधून लोकांच्या हृदयात त्यांच्यासाठी एक वेगळीच जागा तयार केली आहे. पण आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती तिच्या चित्रपटात तर चांगलीच गाजली परंतु हळू-हळू फिल्मी दुनियेपासून दूर होत गेली. ज्या सुंदर अभिनेत्रीविषयी आपण चर्चा करत आहोत, तिने ८०च्या दशकात बॉलीवूडसाठी खूप सारे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हो! तर मंडळी आपण बोलत आहोत ‘यास्मीन जोसेफ’ उर्फ ‘मंदाकिनी’ बद्दल. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, यास्मीनने १९८५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट “राम तेरी गंगा मैली” मध्ये गंगा ची भूमिका निभावली होती. त्यावेळेस यास्मीनने सुपरस्टार राज कपूरच्या सर्वात लहान मुलाबरोबर म्हणजेच राजीव कपूर सोबत काम केले होते.

आपला पहिला चित्रपट सुपरहिट गेल्यामुळे मंदाकनीला बॉलीवूड मधून मोठं-मोठ्या दिग्दर्शकांकडून चित्रपटासाठी ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने भरपूर चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचा दुसरा चित्रपट एवढा हिट नव्हता जेवढा कि तिचा पहिला चित्रपट सुपरहिट होता तरी देखील दर्शकांनी तिला भरपूर प्रतिसाद दिला.मंदाकिनी हि अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या कनेक्शन मध्ये होती ह्यामुळे ती सारखीच चर्चेमध्ये यायची. सूत्रांनुसार असे सांगण्यात येते कि मंदाकिनी, दाउद ची गर्लफ्रेंड होती व ह्या दोघांचे अनेक फोटोस आणि लोकांनी अनेकदा त्यांना सोबत पाहिले आहे. जेव्हा मीडियाने मंदाकिनी ला दाऊदविषयी विचारले, तेव्हा तिने सांगितले कि ती दाऊदची फक्त मैत्रीण होती आणि ती दाऊदला व्यवस्थित ओळखत देखील नाही. पण काही बातम्यांनुसार सांगितले जाते कि दाऊदने मंदाकिनीला खूप साऱ्या चित्रपटात काम मिळवून दिले आहे.मंदाकिनीने नंतर बौद्ध डॉक्टर काग्युर टी. रिनपोछे ठाकूर सोबत लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा तसेच एक मुलगी देखील आहे, ज्यांची नावं रब्बील आणि रबसे इनया ठाकुर असे आहे. मंदाकिनीने मिथुन चक्रवर्ती सोबत ‘डांस डांस’, आदित्य पंचोली सोबत ‘कहा है कानून’ तसेच गोविंदा सोबत ‘प्यार करके देखो’ अश्या चित्रपटात काम केले आहे.लग्नानंतर मंदाकनी चित्रपटांपासून खूप दूर राहिली व काही वर्ष तर बॉलीवूडमध्ये दिसली सुद्धा नाही. पण सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटोस वायरल होत आहेत. फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता कि एवढे वर्ष ती बॉलीवूडपासून दूर असून देखील तेवढीच सुंदर दिसत आहे. मंदाकनी आता तिब्बती औषधांचे एक केंद्र देखील चालवत आहे. याव्यतिरक ती सध्या लोकांना तिब्बत योगाचे प्रशिक्षण देते व तिब्बतचे हर्बल सेंटर देखील चालवते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *